Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महागाईचा भडका : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

---Advertisement---

मुंबई : सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

---Advertisement---

सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने (OMCs) प्रति सिलिंडर 104 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही दर वाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली नसून ती व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. गेल्या एक मार्चला व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 268.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महागला आहे. नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 2,355 रुपयांवर पोहोचले आहेत.

आधीच पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत असल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यात व्यवसायिक गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईचा भडका उडणार आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण देखील महाग होण्याची शक्यता आहे. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून भाव स्थिर आहेत.

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles