Wednesday, September 18, 2024
Homeबॉलिवूडमराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री (अंबाक्का) प्रेमा किरण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...

मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री (अंबाक्का) प्रेमा किरण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !

मुंबई : मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते.

चित्रपटच नव्हे, तर अनेक मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. ‘धुम धडाका’, ‘पागलपन’, ‘अर्जुन देवा’, ‘कुंकू झाले वैरी’ आणि ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘धुम धडाका’ चित्रपटातील त्यांनी साकारलेली ‘अंबाक्का’ प्रचंड गाजली होती.

प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत भरती, 40,000 रूपये पगाराच्या नोकरीची संधी ! 6 मे अंतिम तारीख

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय