Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपावसाने ओढ दिली आहे, खरीप हंगाम धोक्यात

पावसाने ओढ दिली आहे, खरीप हंगाम धोक्यात

पुणे : रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले आहे, मृगाचा पाऊस म्हणावा तसा पडलेला नाही.राज्यातील खरीप हंगामात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दरवर्षी अंदमान बेटे, केरळ, तामिळनाडूतून मान्सून सुरू होतो, मात्र दक्षिण पट्ट्यात मान्सूनची दमदार सुरवात झालेली नाही. बीपरजॉय चक्रीवादळ व अलनिनो मूळे मान्सूनचे वेळापत्रक व चक्र बददलेले आहे.

पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी पहिला जून महिना संपला आहे व ६२ टक्के पावसाची तूट आहे. तुरळक व विखुरलेल्या पावसाने हजेरी लावली आहे. तो येणार या आशेने केलेली पेरणी व उगवलेले अंकुर आता किडीचे भक्ष्य ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोकण, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी व पुणे जिल्ह्यातील मावळ खोऱ्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही, तळ कोकणात पाऊस नसल्याने भातलावणी धोक्यातआली आहे.जुलै महिन्यात पाऊस पडावा अशी अपेक्षा ठेवून कोकणी माणूस प्रार्थना करत आहे.

राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) १४२.०२ लाख हेक्टर असून २१ जूनअखेर १.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे १.३९ टक्के पेरणी झाली आहे. राज्यात खरीप पिकांचे ऊस पिकासह सरासरी क्षेत्र १५२.९७ लाख हेक्टर क्षेत्र असून १.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे फक्त १.३० टक्के पेरणी झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात नमूद केले आहे. राज्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय