Sunday, May 5, 2024
Homeकृषीपावसाच्या पाण्यात चक्क रेल्वे वाहून गेली !

पावसाच्या पाण्यात चक्क रेल्वे वाहून गेली !

आसाम :  आसाम आणि शेजारी राज्य मेघालय आणि अरुणाचल प्रदेश येथे गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मारा सुरु आहे. परिणामी येथील नद्यांचा जलस्तर वाढतच चालला आहे. कोपिली नदी धोक्याच्या पातळीवर वाहताना दिसत आहे.

आसाममधील अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे दीमा हसाओ जिल्ह्यातील हाफलोंग स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. या स्थानकातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिथं रुळावर उभ्या असणाऱ्या रेल्वे गाड्याही पलटी होताना दिसत आहेत.

आसाम राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार एकट्या कछार येथे 51,357 जण प्रभावित झाले आहेत. पूराच्या पाण्यामुळं 16,645.61 हेक्टर क्षेत्रातील पिकांचंही प्रचंड नुकसान झालं आहे.

यंदा पडणार मुसळधार पाऊस ; या राज्यांना येलो अलर्ट !

पूराच्या पाण्यात अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचलवण्यासाठी इथं यंत्रणा मेहनत घेताना दिसत आहेत. आसाममधील निसर्गाच्या रौद्र रुपाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं पाहणाऱ्यांच्या मनात पावसाबद्दल भीतीचं वातावरणही दिसत आहे.

गहू निर्यातीवर बंदी ; भारत सरकारच्या नवीन धोरणाचे” हे ” होतील परिणाम !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय