Saturday, May 18, 2024
Homeराज्यगौतम अदानीची मीडिया क्षेत्रात एन्ट्री? वाचा !

गौतम अदानीची मीडिया क्षेत्रात एन्ट्री? वाचा !

नवी दिल्ली / सर्वेश सवाखंडे : ऑगस्ट २०१३ मध्ये जेफ बेझोस या ऍमेझॉन च्या मालकाने प्रचंड लोकप्रिय वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतली. भारतात मुकेश अंबानीने त्यानंतर अवघ्या ९ महिन्यानंतर म्हणजे मे २०१४ रोजी सी एन एन आयबीएन विकत घेतली. त्याला भारतातील मीडिया स्पेस मधील सर्वांत मोठी डील म्हंटलं गेलं. आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्या व्यवसायात उतरलीये.

अवघ्या २१ दिवस आधी म्हणजे २६ एप्रिल २०२२ रोजी जन्माला आलेली ‘ए एम जी नेटवर्क्स मीडिया लिमिटेड’ आता या आखाड्यात उतरली आहे. गौतम अदानी ची ही कंपनी ‘क्विंटीलीयन बिजनेस मीडिया’ मधील मायनर स्टेक म्हणजे ४९% भागभांडवल विकत घेणार आहे.

यंदा पडणार मुसळधार पाऊस ; या राज्यांना येलो अलर्ट !

कृषी विज्ञान केंद्र, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

त्याची रक्कम अजून अज्ञात आहे. ‘क्विंटीलीयन बिजनेस मीडिया’ जी आतापर्यंत ‘ब्लुमबर्ग क्विंट’ या नावाने चालू होती त्याचं नाव बदलून आता ‘बी क्यू प्राईम’ होणार आहे.

‘क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेड’ ने ही डील कन्फर्म केली आहे. त्यांच्या मते ‘क्विंटीलीयन बिजनेस मीडिया लिमिटेड’, ‘क्विंटीलीयन मीडिया लिमिटेड’ आणि ‘ए एम जी नेटवर्क्स मीडिया लिमिटेड’ यांच्या मध्ये १ मार्च २०२२ रोजी ४९% भागभांडवल ‘ए एम जी नेटवर्क्स मीडिया लिमिटेड’ कडे देण्यात येईल असा सामंजस्य करार झाला आहे. 

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

जरी अदानी ग्रुप ने मायनॉरिटी स्टेक विकत घेतले असले तरीही अदानी ग्रुप चा क्विंट डिजिटल चे ‘द क्विंट’, ‘द न्यूज मिनिट’, ‘क्विंटायप टेक्नोलॉजी’ आणि ‘युथ की आवाज’ यांवर कोणतेही नियंत्रण असणार नाही असे ‘क्विंट डिजिटल’ ने स्पष्ट केले आहे.

ए एम जी मीडिया नेटवर्क्स चे डायरेक्टर प्रणव अदानी, सुदीप्त भट्टाचार्य आणि संजय पुगलिया आहेत. अदानी ग्रुपचे मार्केट कॅपिटलायजेशन १५० अब्ज अमेरिकन डॉलर आहे

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

रयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय