Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाब्रेकिंग न्यूज : राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणूका लवकरच जाहीर होण्याची शक्यता,...

ब्रेकिंग न्यूज : राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणूका लवकरच जाहीर होण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुका पावसाळा झाल्यानंतर घ्याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) केला होता.

या अर्जावर आज सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ज्या ठिकाणी फार पाऊस पडत नाही, त्या ठिकाणी निवडणूका घ्यायला हरकत काय आहे, असा प्रश्न न्यायालयाने केला आहे.

तसेच जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूकांचा कार्यक्रम तयार करावा, असेह न्यायालयाने म्हटले आहे. तसेच ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे, त्या ठिकाणची अडचण आम्ही समजू शकतो, या ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणूका घेऊन शकतो. त्यानुसार निवडणूकांचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, अशा ठिकाणी सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यापर्यंत थांबण्याची गरज नाही, असंही न्यायालयाने म्हटले आहे.

त्यामुळे राज्य निवडणूक आयोग कशाप्रकारे निवडणुकांचा कार्यक्रम आखते हे पहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देशानुसार आता राज्यात लवकरच निवडणूकांची रणधुमाळी  लागण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त न्यूज 18 लोकमत ने दिलं आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय