Wednesday, December 4, 2024
Homeराजकारणभारत चीन तणाव; पंतप्रधान गप्प का आहेत? राहुल गांधी यांचा प्रश्न

भारत चीन तणाव; पंतप्रधान गप्प का आहेत? राहुल गांधी यांचा प्रश्न

(प्रतिनिधी):- भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाख जवळच्या सामी रेषेवर संघर्ष सुरु आहे. दरम्यान, चीनी सैन्य आणि भारतीय सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत तर चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. गॅल्वान खोऱ्यात सुरु असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्री दोन्ही सैन्यात झटापट तसेच चकमक झाली.

       या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, या वरून कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान गप्प का आहेत? असा  प्रश्न उपस्थित केला आहे.

       राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “पंतप्रधान गप्प का आहेत? ते का लपवत आहे. बास म्हणजे बास. आपल्याला काय घडले हे माहित असणे आवश्यक आहे. चीनने आपल्या सैनिकांना मारण्याचे धाडस कसे काय केले? त्यांची जमीन घेण्याची त्यांची हिम्मत कशी झाली?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जवानांप्रती काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

       राहुल गांधी यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, 

“ज्या अधिकारी आणि जवानांनी देशासाठी आपले प्राण दिले त्याबद्दल जाणवत असलेली वेदना कोणतेही शब्द व्यक्त करु शकत नाहीत. त्यांच्या प्रियजनांचं मी सांत्वन करतो. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत आहोत.”

संबंधित लेख

लोकप्रिय