Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उरण येथे केंंद्र सरकारकडे जनतेच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उरण येथे केंंद्र सरकारकडे जनतेच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन.

प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने उरण येथे केंंद्र सरकारकडे जनतेच्या मागण्यांकडे लक्ष विधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. 

             केंद्र सरकारने कोवीड १९ची साथ सुरु झाली असताना अमेरीकन अध्यक्ष ट्रम्पचे कार्यक्रम करत राहीले, अचानक लॉक डाऊन मुळे स्थलांतरीत मजूर आप आपल्या गावी पायी चालत  राज्यात पोहचले. ते भूकेन व्याकूळ झाले असताना देखिल त्यांचे पर्यंत धान्य पोहोचले नाही. सीटूने शेकडो कुटुंबांपर्यंत धान्य पोहचवले. पाठपुरावा करुन जे.एन.पी.टी. ला उरण तालुक्यात केअर पॉइन्ट हॉस्पिटल मध्ये व शेजारी असलेल्या ट्रेनिंग सेंटर मध्ये कोविड १९ च्या रुग्णांची व्यवस्था करण्यास भाग पाडले, असे सीटू राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील म्हणाले.

       पनवेल तालुक्यातील खेरणे येथे सुमारे ३० दिवस शिजवलेले अन्न २५० लोकांना वितरीत केले.पण शासकीय गोदामात धान्य साठविण्या पेक्षा सहा महीने माणशी १० किलो धान्य केंद्र सरकारने वितरण करण्याची मागणी करण्यात आली.

           सरकारी कंपन्यांच्या विक्रीला, खाजगीकरणाला विरोध करत कामगारांनी लढून मिळवीलेले हक्क, कामगार कायदे रद्द करु नये अशी मागणी केली सीटू जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे यांनी केली.

            प्रत्येक कुटुंबाला दरमहा७ हजार ५०० रु द्या, मनरेगा ची कामे सुरू करा, किमान २०० दिवस काम द्या, पेट्रोल व डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ  मागे घ्या, असे  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर म्हणाले.

         त्याशिवाय दिनांक ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानग्रस्त जनतेला सन्मानजनक मदत द्या व त्यांचे योग्य पुनर्वसन करा अशी राज्य व केंद्र सरकार कडे मागणी केली आहे. शेवटी भाषण नको रेशन द्या, लाल बावटे की जय, इंन्कलाब जिंदाबाद आशा घोषणा देण्यात आल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय