Rahul gandhi : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले आहे, परंतु विरोधी आघाडी ‘इंडिया’नेही चांगली कामगिरी केली आहे. केंद्रात भाजप लवकरच सरकार स्थापन करणार आहे. काही वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात. अशात आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते कोण होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. (Leader Opposition in LokSabha)
लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरी नंतर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते व्हावे, अशी इच्छा काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने गेल्या 10 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पक्षाने लोकसभेत 99 जागा जिंकल्या आहेत. मात्र इंडिया आघाडी सरकार स्थपन करू शकत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली जात असली तर राहुल गांधी हे जबाबदारी स्विकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहले आहे की, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काँग्रेसचे नेते बनण्याचे आवाहन केले. तामिळनाडूतील विरुधुनगरमधून विजयी झालेले टागोर म्हणाले, ‘मी माझे नेते राहुल गांधी यांच्या नावाने मते मागितली. ते लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावेत, असे मला वाटते. मला आशा आहे की काँग्रेसचे निवडून आलेले खासदारही असाच विचार करतील. काँग्रेस संसदीय पक्ष काय निर्णय घेतो ते पाहूया. आम्ही लोकशाहीवादी पक्ष आहोत.
Rahul Gandhi
दरम्यान, भारत आघाडीत समाविष्ट असलेला पक्षही सरकार स्थापनेचा मार्ग शोधत आहे. एनडीएमध्ये असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याकडे विरोधी पक्षांच्या नजरा आहेत.
हेही वाचा :
राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…
फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती
बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव