Sunday, May 19, 2024
Homeराजकारणपुण्यात राडा : किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की, रुग्णालयात केले दाखल

पुण्यात राडा : किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की, रुग्णालयात केले दाखल

Photo : Kirit Somaiya / Twitter

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मध्ये काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे, मात्र आज किरीट सोमय्या पुण्याच्या दौर्यावर असताना सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी ते पायरीवरून कोसळले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोव्हिड जंबो सेंटरबाबत खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. राऊत यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या जात असताना त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पायरीवरून कोसळले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताला ईजा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे भाजप आणि शिवसेनेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.

ब्रेकिंग : पुणे जिल्ह्यातील शाळा “या” तारखे पासून पूर्णवेळ सूरू होणार

महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून किरीट सोमय्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत आहेत. त्यांच्या या विधानामुळे शिवसैनिकात प्रचंड नाराजी आहे. भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आम्हाला निवेदन द्यायचे होते. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे कि, “पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.”

धक्कादायक : दलित तरुणांने मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याने दलित समाजावर टाकला बहिष्कार

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे की, “राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!”

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय