Sunday, May 19, 2024
Homeआंबेगावउमेदवारांला पोत्यात घालून विहिरीत फेकलं; जुन्नरमध्ये खळबळ

उमेदवारांला पोत्यात घालून विहिरीत फेकलं; जुन्नरमध्ये खळबळ

जुन्नर : नुकत्याच होऊ घातलेल्या जुन्नर बाजार समितीचे उमेदवार व बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांची निघृन हत्या झाली. ही घटना उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तांबे यांना पोत्यात बांधून विहिरीत फेकले होते. यामुळे या खुनाला राजकिय वळण असल्याची चर्चा आहे.


तांबेवाडी बेल्हे येथील किशोर कोंडीभाऊ तांबे (वय 40) हे शेतात जातो असे सांगत निघून गेले होते. ते दिनांक 5 तारखेपासून बेपत्ता होते. दरम्यान ते सापडत नसल्याने नातलगांनी आळेफाटा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याबाबत ते त्यांच्या दुचाकीसह बेपत्ता असल्याने काही घातपात तर झाला नसावा याबाबत त्या दिशेने पोलीसांनी तपास केला. शेतात रक्ताचे डाग आढळून आलेचे व तिथे काहीतरी झटापट झाल्याची माहिती मिळाली. डॉग स्क्वॉडने कॅनोलपर्यंत माग काढला. परंतु, पुढे माग लागला नाही.

आळेफाटा पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी किशोर तांबे यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला असल्याची कबुली दिली. पोलीस व स्थानिकांनी आज सकाळी विहिरीतून किशोर तांबे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तद्नंतर मृतदेह हा आळे येथील प्राथमिक केद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्याचा कसून तपास चालू आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय