Monday, May 20, 2024
Homeराज्यपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची वीज बिलाबाबत मोठी घोषणा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची वीज बिलाबाबत मोठी घोषणा

चंदिगड : पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने जनतेला अनेक आश्वासने दिली होती. त्यामध्ये मोफत वीज देण्याचे देखील आश्वासन “आप”ने दिले होते. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी वीज बिलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

पंजाबच्या निवडणुकीपूर्वी ‘आप’ने पंजाबच्या जनतेला ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता आप सरकार ३०० युनिट नव्हे तर ६०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती स्वतः मान यांनी ट्विट करुन दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज मंत्रिमंडळाने प्रत्येक बिलावरील ६०० युनिट वीज माफ करण्यास मंजुरी दिली आहे. खरे तर पंजाब विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. ती पूर्ण न केल्याने विरोधी पक्षांनीही ‘आप’वर निशाणा साधला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय