Pune / आनंद कांबळे : ग्रामविकास विभागाचे प्रधानसचिव यांनी किसान सभेच्या आंदोलनाची दखल घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणाचे बुडीत क्षेत्र मधील संपादन होवून शिल्लक राहिलेले, आंबेगावचे भौगोलिक क्षेत्र, लगतच्या ग्रामपंचायत बोरघर, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे मध्ये समाविष्ट करणेबाबत, ग्रामस्थ, व किसान सभा अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत.
या अनुषंगाने किसान सभेच्या वतीने, दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी, पुणे जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन सूरू करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत, ग्रामविकासाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, यांच्याशी फोनवर संवाद साधून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी, आवश्यक त्या सूचना दिल्या. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विजयसिंह नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या समवेत किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. (Pune)
या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानुसार सायंकाळी आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषद, दि.२३ ऑगस्ट पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाला सादर करणार आहे. व त्यानंतर हा प्रस्ताव मान्य होण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून प्रयत्न केले जाणार आहे. याकामी स्वत: प्रधान सचिव यांचे सहकार्य मिळणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र सुमारे १० हेक्टरच्या आसपास आहे. व काही निवासी घरे आहेत. (Pune)
याठिकाणी मुख्यत: आदिम जमाती कातकरी या समाजाचे वास्तव्य आहे. हे उर्वरित क्षेत्र कोणत्याच ग्रामपंचायतीला न जोडल्यामुळे आदिम जमाती कातकरी यांना आदिवासी विकास विभागाकडून व शाश्वत संस्थेकडून उपलब्ध झालेल्या निधीतून जी घरकुले बांधण्यात आली आहेत त्यांची नोंदही होऊ शकली नाही. तसेच कोणत्याही नागरी सुविधा त्यांना प्राप्त झालेल्या नाहीत.
या अनुषंगाने या अगोदर अनेक वेळा आंदोलने करण्यात आली होती व चार दिवसाचे उपोषण ही किसान सभेने या अगोदरच केलेले होते. परंतु हा विषय अद्याप प्रलंबित होता. या पार्श्वभूमीवर हे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. परंतु किसान सभेच्या या आंदोलनाची दखल थेट राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी घेतल्याने आंदोलक यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पण या प्रस्तावावर राज्य शासनाच्या वतीने सकारात्मक निर्णय तातडीने झाला नाही तर किसान सभेच्या वतीने पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा, किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे यांनी दिला आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष सचिन बगाडे, नागेश भोसले, सरपंच दत्ता गवारी, शिक्षक संघटनेचे नेते बाळासाहेब लांघी, ठकसेन गवारी, संतोष गवारी, मार्क्सवादी कॅम्युनिस्ट पक्षाचे डॉ.महारुद्र डाके, एस.एफ.आय.संघटनेच्या नेत्या आरती निर्मळ इ.उपस्थित होते.
या बेमुदत धरणे आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे, उपाध्यक्ष राजू घोडे, मंदा मुकणे, माणिक अशोक वळणे, संतोष काळे, बबन पवार, नवनाथ वळणे यांनी केले होते.
हेही वाचा :
मोठी बातमी :…तर लाडकी बहीण योजना थांबवू ; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले