जुन्नर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार श्रीमती लताबाई श्रीकृष्ण तांबे (वय 85) यांचे आज शनिवारी (दि. २९ मे ) सायंकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या दिवंगत माजी आमदार श्रीकृष्ण तांबे यांच्या पत्नी होत. श्रीकृष्ण तांबे यांच्या निधनानंतर 1973 च्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये लताबाई तांबे या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून प्रथम महिला आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांची जुन्नर पंचायत समितीवर स्वीकृत सदस्य म्हणूनही निवड झाली होती. त्याच दरम्यान त्या पुणे जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या म्हणूनही काम करत होत्या.