Tuesday, May 7, 2024
Homeकृषीपुणे : जन आंदोलनाची संघर्ष समितीच्या वतीने शहीद महात्मा गांधी यांची जयंती...

पुणे : जन आंदोलनाची संघर्ष समितीच्या वतीने शहीद महात्मा गांधी यांची जयंती साजरी; कामगार, किसान कायद्याच्या केला निषेध

पुणे : आज 30 जानेवारी, शहीद महात्मा गांधी यांच्या शहीद दिनी विविध विविध संघटनानी सत्याग्रह आणि उपोषण करून कामगार, किसान विरोधी कायद्याचा निषेध केला. पुणे शहरामध्ये जनसंघर्ष समितीतर्फे सकाळी 9 ते 1 या वेळात उपोषण व धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली व्यक्त करण्यात आली. तसेच जोरदार घोषणा करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि सहभाग व्यक्त करण्यात आला.

पुणे स्टेशन येथील शहीद महात्मा गांधी पुतळा येथे जन आंदोलनची संघर्ष समिती तर्फे मेधाताई पाटकर आणि डॉ. बाबा आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी लता भिसे, सुनीती सु. र. , असलम बागवान यांनी संबोधित केले. 

या कार्यक्रमावेळी बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे, सुनिती सु. र., लता भिसे, साधना दधीच, विजया चौहान, अलका पावनगडकर, इब्राहिम खान, असलम इसाक बागवान, मनिष देशपांडे, वीणा कदम, आरिफ मोलाना, श्रावनी बुवा, ऍड. अफरोज मुल्ला, सूफी शेख व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय