Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : भोर येथील पिडीतेला तात्काळ न्याय द्या अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन...

Pune : भोर येथील पिडीतेला तात्काळ न्याय द्या अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार- अविनाश बागवे

भोर येथील अत्याचारप्रकरनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करा – अविनाश बागवे (Pune)

पुणे : मौजे वरदे ब्रु. ता. भोर जिल्हा पुणे येथील मातंग समाजाच्या २ वर्ष वयाच्या अल्पवलीन अत्याचार झालेल्या मातंग समाजातील अल्पवयीन मुलीला तत्काळ न्याय द्या अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी दिला आहे. (Pune)

त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले आहे. यावेळी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ही मागणी त्यांनी केली आहे.

मागील काही महिन्यापासुन सातत्याने पुणे शहर व जिल्हयातील वेगवेगळ्या भागामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारामध्ये मोठया प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असुन ही बाब अत्यंत चिंताजनक, निंदनिय व माणुसकीला काळीमा फासणारी असून यापुर्वी अशा प्रकारच्या घटना कधीही घडत नव्हत्या व घडलेल्या नाहीत.

अलीकडच्या काळामध्ये असे सरास प्रकार दररोज पाहायला मिळतात कारण महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे विस्कळीत झालेली असुन गुन्हेगारावरती पोलिस प्रशासनाचा वचक राहीलेला नाही म्हणुन अशा प्रकारच्या निच व वाईट प्रवृत्तीला जो पर्यंत कठोरातली कठोर शिक्षेची तरतुद कायदयामध्ये होत नाही आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय अशा प्रकारच्या घटनेला आळा बसणार नाही.

तेव्हा या प्रकरणातील आरोपी प्रद्युम्म संतोष शेलार यास बाल लैंगिक अत्याचार कायदयानुसार जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेकडुन आम्ही मागणी करीत आहोत.

तसेच कुमारी हिचे पालक तकार दाखल करण्यास गेल्यानंतर तेथील संबधीत पोलिस अधिकारी यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात न घेता तकार दाखल करून घेण्यास टाळटाळ केली अशा संबधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करावी हि विंनती.

अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने या विरोधात तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, यांच्या अॅड. राजश्री अडसूळ, अध्यक्ष पुणे शहर मं.ए.आ महिला,अध्यक्ष पुणे शहर सुरेखा खंडाळे, सरचिटणीस दयानंद अडागळे, शहर कार्याध्यक्ष रमेश सकट, डॉ. रमाकांत साठे यासह पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

संबंधित लेख

लोकप्रिय