Tuesday, October 8, 2024
Homeक्राईमPune  : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

Pune  : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

Pune : शहरातील कर्वेनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक धक्कादायक आणि भयानक घटना घडली आहे. श्रीमान सोसायटीत राहणाऱ्या राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय 42) यांची अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे, आणि पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणारी मोठी घटना घडली आहे.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने बुरखा घालून मध्यरात्री एक वाजता राहुल यांचे घर वाजवले. दरवाजा उघडताच धारदार शस्त्राने राहुल यांच्यावर सपासप वार केले. त्यांच्या आरडाओरडीनंतर घरातील पत्नी व मुली जाग्या झाल्या, मात्र तोपर्यंत हल्लेखोराने त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. हल्लेखोराने घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या आणि पसार झाला. 

राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. या भयानक घटनेमुळे त्यांच्या मुलींना आणि पत्नीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय