Tuesday, October 8, 2024
Homeराज्यBeed : कार आणि कंटेनरच्या धडकेत चार जण जागीच ठार

Beed : कार आणि कंटेनरच्या धडकेत चार जण जागीच ठार

Beed : जिल्ह्यात रविवारी पहाटे अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर नांदगाव पाटीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात कार आणि कंटेनरच्या धडकेमुळे झाला असून, सर्व मृत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी होते. अपघात बर्दापूर फाटा येथे पहाटे ५ वाजता घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे समोरून येणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने कार चालकाने नियंत्रण गमावले आणि कार थेट कंटेनरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.अपघातानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळ उडाला होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून त्यांना आंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, अपघातांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

Beed

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरत

संबंधित लेख

लोकप्रिय