Bihar : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील कोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुचाकी चोरीच्या संशयावरून तिघा तरुणांवर जमावाने बेदम मारहाण केली, ज्यात एकाचा मृत्यू झाला. फुलवारिया प्रभाग 4 मध्ये घडलेल्या या घटनेत पंचानंद उर्फ पंच लाल नावाच्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, एफआयआरमध्ये चार जणांची नावे नमूद करण्यात आली असून, काही अज्ञात व्यक्तींचाही समावेश आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, इतर आरोपींच्या शोधासाठी कारवाई सुरू आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार,पंचानंद ऋषी आपल्या मित्रांसह फुलवारिया दास टोला येथे गेले होते. तिथे गावकऱ्यांनी सायकल चोरीचा आरोप करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती पोलिस क्रमांक 112 ला देण्यात आली.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांना रुग्णालयात दाखल केले, मात्र पंचानंदचा मृत्यू झाला.
सध्या या प्रकरणाची तपासणी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल
Bihar
हेही वाचा :
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी