पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे; पिंपरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : दि. ४ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्रीपद आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. अजितदादा पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच अजितदादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील अजित पवार समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी पेढे वाटण्यात आले तसेच फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
याबाबत अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील सर्वांत वेगाने विकसीत होणारे शहर म्हणून नावारुपाला आले होते. अजितदादा उपमुख्यमंत्री होताच त्यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरूवात केली असून गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहेत. तसेच आता पालकमंत्रीपदही अजितदादांकडे आल्याने रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याचा बारीक अभ्यास असल्याने तसेच पुढील ५० वर्षांच्या विकासाच्या नियोजनाची दृष्टी दादांकडे असल्यामुळे शहर व जिल्ह्याच्या विकासात भर पडेल असा विश्वासही अजित गव्हाणे यांनी केला आहे.
फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी विरोधी विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विशाल काळभोर, प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सचिन औटे, माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, सतीश दरेकर, प्रभाकर वाघेरे, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, अक्षय माछरे, सामजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, मीरा कदम, ज्योती गोफणे, संगीता कोकणे, दिपाली देशमुख, आशा मराठे, सविता धुमाळ, शक्रूल्ला पठाण, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, रवींद्र सोनवणे, अजित पोपट पवार, खंडेराव काळे, सचिन मोकाशी यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.