Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PUNE : महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार एकाच वेळी अर्ज भरणार

Pune / क्रांतीकुमार कडुलकर : महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर हे तीनही उमेदवार गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. Maha vikas aghadi news

दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, श्री. रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून विजयाचे रणशिंग फुंकणार आहेत. अशी माहिती प्रशांत सुदामराव जगताप
पुणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि अमोघ ढमाले प्रसिध्दी प्रमुख, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) यांनी दिली आहे. Pune news

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

---Advertisement---

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles