मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील आलिशान निवासस्थान ‘अँटिलिया’बाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. (Antilia Waqf land) आव्हाड यांनी दावा केला आहे कि, “अंबानींचे घर हे वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधले गेले आहे.” या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ | Antilia Waqf land
लोकसभेत नुकतेच मंजूर झालेल्या वक्फ संशोधन विधेयक २०२५ च्या संदर्भात जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी “लोकांच्या धार्मिक विषयात जायची काय गरज आहे. संविधानाचं उल्लंघन करण्याच काम सुरू आहे. आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे. मग आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? एकदा जमीन वक्फ करण्यात आली, म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली. परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही. असे आव्हाड म्हणाले. (हेही वाचा – यूपी सरकारच्या बुलडोजर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, 60 लाख रुपयांचा दंड, पीडितांना नुकसान भरपाईचे आदेश)
पुढे ते म्हणाले, कायदा करायचा असेल तर असा करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. त्यांच्या वाड-वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत. अंबानीचं घर हे वक्फच्या जमिनीवर आहे”, असा मोठा दावा आव्हाड यांनी यावेळी केला. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)
असदुद्दीन ओवैसी यांचाही असाच दावा
AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वीच असाच दावा केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “अँटिलिया ही वक्फची जमीन आहे आणि ती यतीमखान्याच्या जागेवर बांधली गेली आहे. (हेही वाचा – शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचे मोठे विधान)
आव्हाड यांच्या दाव्याने सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू केली आहे. काहींनी त्यांच्या दाव्याचे समर्थन केले आणि वक्फ जमिनीच्या गैरवापरावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी हा दावा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)