Sunday, May 19, 2024
Homeराज्यसंशोधक विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध -...

संशोधक विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध – एसएफआय

मुंबई : संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप विषयावर हिवाळी अधिवेशनात चर्चा सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून काय दिवे लावणार?’ असे अपमानजनक वक्तव्य केले. संशोधन कार्य आणि संशोधक विद्यार्थ्यांचा असा अपमान करणाऱ्या अजित पवार यांच्या वक्तव्याचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटी जाहीर निषेध करते. आणि अजित पवार यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली पाहिजे अशी मागणी एसएफआय करत असल्याचे एसएफआय चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ व राज्य सचिव रोहिदास जाधव म्हणाले.

एसएफआय नो म्हटले आहे की, सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने संशोधन विषयाला अशा प्रकारे दुय्यम लेखणे हे चुकीचेच आहे. यावरून सत्ताधारी, शिक्षण आणि संशोधन विषयाला किती महत्त्व देतात? हे लक्षात येते. खरंतर राज्यात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. संशोधन कार्यामुळे वेगवेगळ्या विषयावर उपयुक्त साधने आणि साहित्य निर्माण होते. अर्थातच त्यातून विकासात भर पडत असते. सत्ताधाऱ्यांना संशोधनाचे महत्त्व कळत नसेल तर हे राज्याला कुठे घेऊन चाललेत? असा आमचा सवाल आहे. सत्तेत बसलेल्यांना शिक्षणाबद्दल इतकी उदासीनता असणे हे चिंताजनक आहे.

संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपमधून सत्ताधाऱ्यांना वाटा मिळत नाही. त्यांना इथे कसलाही भ्रष्टाचार करता येत नाही. म्हणून हा निधी इतर योजनांकडे वळवून त्यातून कमिशन खाण्यासाठी फेलोशिपमध्ये कपात करण्याचे कटकारस्थान रचले जात आहेत. फेलोशिपसाठीची विद्यार्थी संख्या घटवणे हा त्याचाच एक भाग आहे. म्हणून संशोधन कार्याला असे हिनवून दुय्यम लेखण्याचा प्रयत्न सत्ताधारी करताहेत. असे एसएफआयचे ठाम मत बनले आहे, असल्याचेही सांगण्यात आले ‌

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी एसएफआय ने केली आहे. तसेच सारथी, बार्टी, महाज्योती व टीआरटीआय या संस्थांतर्गत दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी संशोधक विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. फेलोशिपला पात्रता म्हणून घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रद्द करावी. वरील सर्व संस्थेत फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून फेलोशिप लागू करावी, या मागण्या एसएफआय ने केल्या आहेत ‌‌.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय