Friday, November 22, 2024
Homeराज्यसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अभाविपचा जाहीर निषेध – SFI

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अभाविपचा जाहीर निषेध – SFI

पुणे : काल २ फेब्रुवारीला रात्री, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करते. तसेच विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अभाविपच्या गुंडांवर कडक कारवाईची मागणी करते, असे एसएफआय चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ व राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी सांगितले.

निर्मळ म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविप सतत विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. आजपर्यंत तिने अनेकवेळा विद्यार्थ्यांवर असे हल्ले केले आहेत. नोव्हेंबर २०२३ आणि २०१७ मध्ये, त्याआधी सुद्धा अशी मारहाण अभाविपने केलेली आहे. अशा घटना तेव्हाच घडतात; जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना तसे प्रशिक्षित केले जाते. अभाविप त्यांच्या कार्यकर्त्यांना केवळ गुंड होण्याचे शिकवते. म्हणून ते सातत्याने विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत आहेत.

विद्यापीठातील विद्यार्थी वर्गात दहशत निर्माण करणे, तेथील लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवणे आणि परिसरातील शांतता भंग करून ती कायम विस्कळीत करण्याचे काम अभाविप करत आहे. अशा गुंडांच्या मुसक्या अवळण्यासाठी, शैक्षणिक परिसरात सतत गोंधळ घालणाऱ्या अभाविपला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बंदी घातली पाहिजे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना अभाविपकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेचा एसएफआय तीव्र निषेध करते. हल्ला करणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करते. तसेच या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व पुरोगामी, लोकशाहीवादी, परिवर्तनवादी विद्यार्थी समूहांनी एकत्र येऊन कृती करण्याचे आवाहन करते, असेही रोहिदास जाधव म्हणाले.

संबंधित लेख

लोकप्रिय