Monday, May 20, 2024
Homeकृषीनिसर्ग चक्रीवादळामूळे झालेल्या नुकसानीची, नुकसानभरपाई त्वरित द्या; पुणे जिल्हा किसान सभेची मागणी.

निसर्ग चक्रीवादळामूळे झालेल्या नुकसानीची, नुकसानभरपाई त्वरित द्या; पुणे जिल्हा किसान सभेची मागणी.

पुणे (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई त्वरीत मिळावी, अशी  मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीच्या वतीने राज्याचे महसूल व वनविभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे ईमेलद्वारे केलेली आहे. 

किसान सभेने म्हटले आहे की, राज्यात जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे, तसेच घरे, व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याबाबतचे पंचनामे हि पूर्ण झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चक्रीवादळामुळे, शेतकऱ्यांना अजूनच आर्थिक संकटात टाकलेले आहे.  विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला आहे.

हिरडा या गौण वनउपजाचे संकलन व विक्री यातून आंबेगाव,जुन्नर तालुक्यातील आदिवासी  बांधवाना दरवर्षी उत्पन्न मिळत असते, परंतु या चक्रीवादळाने हिरडा या गौण उपजाचे मोठे नुकसान झालेले आहे. या हिरडा झाडांचे पंचनामे ही झालेले आहेत, अशा आदिवासी शेतकऱ्यांना ही तातडीची मदत मिळावी अशी संघटनेची मागणी आहे.

नुकसान भरपाई देतानाच्या घटकांत शेतपिके, फळबाग पिके याबरोबरच हिरडा या गौण वनउपजचा अधिकृत समावेश शासननिर्णयात करावा, तसेच पडझड झालेल्या कच्च्या व पक्क्या घरांसाठी, घरातील वस्तूसाठी तात्काळ अर्थसहाय्य वितरित करावे अशी ही मागणी संघटनेने केली आहे. 

अखिल भारतीय किसान सभेचे ऍड.नाथा शिंगाडे, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, राजू घोडे, डॉ. मंगेश मांडवे आदींच्या सह्यांचे निवेदन, मुख्यमंत्री, अदिवासी विकास विभागाचे मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे यांनाही ही माहितीसाठी ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय