पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी येथे निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व आंदोलक मणिपूर जळत असताना पुरस्कार कसे घेऊ शकतात, कोणतीही ठोस योजना नसताना भूमिपूजन कशासाठी? असा जाब विचारण्यासाठी पिंपरी येथे आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करत होते. या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती.
मात्र, आंदोलकांनी बंदी आदेश झुगारून पंतप्रधानांच्या निषेधार्थ आंदोलन केले. अखेर पिंपरी पोलिसांनी आंदोलक नेते, कार्यकर्ते व महिला आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे.
नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, काँग्रेसचे कैलास कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इम्रान शेख, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल रोहम रेल्वे युनियनचे संतोष कदम, कामगार नेते राजन नायर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, महिला नेत्या अंजली गायकवाड, काँग्रेस महिला शहा सायली नढे, ज्योती जाधव,मेघा आठवले, स्वाती कदम, नरेंद्र बनसोडे, झेवीयर अनथोनी, उमेश खंदारे, जितेंद्र छकंगबडा, सुरेश गायकवाड, अरुण थोपटे, प्रदीप पवार, प्रवीण कदम, भरत वाल्हेकर, भरती घाग, सुवर्णा कदम, सुनीता पिसाळ, शोभा साबळे, निर्मला खैरे सह 150 हुन अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.