Thursday, May 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआमदार अण्णा बनसोडे यांची तत्परता : वल्लभनगर बस स्थानकावरील भले मोठे खड्डे...

आमदार अण्णा बनसोडे यांची तत्परता : वल्लभनगर बस स्थानकावरील भले मोठे खड्डे 2 दिवसात बुजवले

वल्लभनगर बस स्थानक व आगराचे पुनर्विकास करण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून पाठपुरावा करणार – आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर (संत तुकाराम नगर) : दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी वल्लभनगर आगार व्यवस्थापक यांनी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना वल्लभनगर बस स्थानकावरील खड्डे व दुरावस्थे बाबत तसेच निगडी बुकिंग ऑफिस बद्दल निवेदन दिले होते. आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या संपूर्ण टीम सह लागलीच दुसऱ्याच दिवशी वल्लभनगर बस स्थानकाला व आगाराला भेट दिली. वल्लभनगर बस स्थानक आवारात भले मोठे खड्डे असल्याने प्रवासी, चालक, वाहक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. आमदार अण्णा बनसोडे यांनी त्याच दिवशी सिमेंट कॉंक्रेटची गाडी बोलावून सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. कार्यालयीन कामकाजाच्या फक्त दोनच दिवसात खड्डे बुजवल्या मुळे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्य तत्परतेची चर्चा संपूर्ण आगारात व शहरात झाली आहे.

वल्लभनगर बसस्थानकाच्या आगार प्रमुख श्रीमती स्वाती बांद्रे यांच्या सोबत संपूर्ण वल्लभनगर बस स्थानक व आगराची पाहणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.

बस स्थानका वरील फलाटाचे कठडे मोडकळीस आलेले आहेत. बस स्थानक आवारात डांबरीकरण व कॉंक्रेटिकरण नसल्याने सर्व दूर धुळीचे साम्राज्य आहे.ड्रेनेज लाइन बुजून गेल्याने पावसाळ्यात पाणी वाहून न जाता बस स्थानक परिसरात जमा होते. तसेच बस स्थानकाची इमारत ही 24 वर्षे जुनी असल्याने काही ठिकाणी स्लॅब देखील खचलेला आहे. ही सर्व दुरावस्था पहिल्या नंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी बस स्थानक व आगराचे पुनर्विकास करण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या महिना भरात निगडी बुकिंग ऑफिस येथे स्थानिक आमदार विकास निधीमधून टॉयलेट बाथरूम बांधून देणार असल्याचे देखील सांगितले. व जे खड्डे आहेत ते 2 दिवसात भरून देतो बोलले व त्यांनी ते करून देखील दाखवले. आमदार अण्णा बनसोडे यांनी बस स्थानकाचे व आगाराच्या प्रश्नांकडे तत्परतेने लक्ष घातल्याने आगारातील अधिकारी व कर्मचारी आनंदी झाले आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाहणी दौऱ्यात वल्लभनगर आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे, सहा. कार्यशाळा अधीक्षक हनुमंत गोसावी, सहा वाहतूक अधीक्षक श्रीमती पल्लवी पाटील, वाहतूक नियंत्रक स्मिता कुटे, वरिष्ठ लिपिक श्रीमती सुरवाडकर पी बी, वाहतूक नियंत्रक रमेश चिपाडे, वाहक विकास तुळे व आगारातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

बस स्थानकाची डागडुजी, तसेच खड्डे भरून देण्याचे काम पुणे मेट्रो यांच्या वतीने करून देण्यात येईल असे आम्हाला सांगितले होते. मात्र, मेट्रो कडे सतत पाठपुरावा करून देखील खड्डे बुजवण्याचे काम करण्यास मेट्रो टाळाटाळ करत होते. अखेरीस आम्ही ही बाब आमदार अण्णा बनसोडे यांना पत्राद्वारे कळवल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार अण्णा बनसोडे यांनी बस स्थानकाची पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ पूर्ण करून दिले त्याबद्दल आगार प्रमुख या नात्याने मी त्यांचे आभार मानते.

– श्रीमती स्वाती बांद्रे, वल्लभनगर आगार व्यवस्थापक

Lic
जाहिरात
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय