मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana
आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश