नाशिक : देशाचे पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर १२जानेवारी २०२३ रोजी येत आहेत. नाशिक दौऱ्यात ईपीएस ९५ पेंशनर्स शिष्टमंडळ भेट मिळावी यासाठी उप जिल्हाधीकरी नाशिक राजेन्द्र वाघ यांना निवेदन पत्र दिले. मात्र वेळ मिळाली नाही म्हणून आज (दि.११) तारखेला ११ वा.काळा राम मंदिर नशिक जमून येथे पेंशनर्स ला केंद्र सरकार ने जगण्या इतकी पेन्शन ९ हजार रूपये महागाई भत्ता सह लागू करावी, ही मागणी पूर्ण करा यासाठी साकडे घातले.
पंतप्रधान भेट मिळाली नाही तर १२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पंचवटी कारंजा नाशिक येथे ११वा येथे मुक निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी सेवानिवृत्त पत्रकार, एस. टी. कर्मचारी, विज, साखर, विडी, आद्याओगिक कामगार आदि १८६ आस्थापनातील कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पेन्शन फेडरेशन ने केले आहे.
देशभरातील ७५ लाख पेक्षा अधिक इ पी एस ९५ पेन्शनरांच्या वतीने विनंती करीत आहोत. नाशिक येथे १२जानेवारी २०२४रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे येत आहेत. तरी ई पी एस पेंशनर्स फेडरेशन शिष्टमंडळास भेटीसाठी वेळ उपलब्ध करून द्यावा. तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी पंत प्रधान येत आहेत. तरी या प्रसंगी ज्येष्ठ कामगार कर्मचारी अल्प पेंशन धारकांना वेळ द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
देशभरातल्या १८६ उद्योगातील निवृत्त झालेले कर्मचारी आहोत. हे उद्योग देशाला वस्तू व सेवा पुरवतात. या उद्योगामध्ये आयुष्यातील ३० ते ४० वर्षे काम केले आहे. त्यांच्या कष्टातून या देशात बदल घडवला व देशाला महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर आणले आहे. जवळ जवळ २० लाख हून अधिक पेन्शनर ना फक्त १००० किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. याकडे लक्ष वेधले आहे. तर सरासरी पेन्शन १५०० रुपये देखील नाही.
उमेदीच्या काळात इपीएफ ९५ च्या निधी मध्ये मोठे योगदान केले आहे. आम्हाला आमच्या या योगदानामुळेच पेन्शन दिली जाते. अतिशय तोकडी पेन्शन, त्याला महागाई भत्त्यापासून संरक्षण नाही, संपूर्ण वैद्यकीय सुविधेचे संरक्षण नाही ही आमची परिस्थिती व देशाच्या विकासाची स्थिती पाहिली तर सरकार आपल्या घटनेच्या निदेशक तत्वा मध्ये घालून दिलेल्या जबाबदाऱ्या पाळत नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे. हे स्पष्ट दिसते की देश महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि पेन्शनर दारिद्र्यात दिवस कंठत आहे.
२०१३ मध्ये तत्कालीन राज्य सभेचे खासदार भगतसिंग कोशियारी समिती नेमण्यात आली होती. समितीने किमान पेन्शन ३ हजार रूपये महागाई भत्ता सह लागू करावी. व मोफत आरोग्य सुविधा द्यावी शिफारस केली होती. व त्या नंतर भा जप तत्कालीन प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आमची सत्ता आली वर १००दिवस त ३ हजार रू. व मोफत आरोग्य सुविधा देऊ आश्वासन दिलं मात्र १०वर्ष होत असताना पाळले नाही. याची आठवण करून खालील मागण्यांवर साकडे घातले.
याप्रसंगी आयटक महाराष्ट्र राज्य सचिव तथा संस्थापक अध्यक्ष फेडरेशन चे राजू देसले, अध्यक्ष कॉ. रमेश सूर्यवंशी, सचिव कॉ.डी.बी.जोशी, कार्याध्यक्ष चेतन पनेर, नामदेव बोराडे, कृष्णा शिरसाठ, धनंजय चतुर, खजिनदार सुभाष शेळके, शिवजी डोबले, रमेश खापरे, कृष्णा शिरसाट, रमेश पाध्ये, उत्तमराव आव्हाड, पांडुरंग सोमवंशी, रामचंद्र टिळेे, मामु शेख, व्हि. डि. धनवटे, मधुकर हांडगे, मधुकर सूर्यवंशीी, सुभाष चव्हाण, जगण सुर्यवंशी, निवृत्ती कर्डीले, बलभीम कुबडे, भिवसेन गुळवे, पंडित पगार, कायस्थ वाडेकर, विठ्ठल वाघ, अमृतकर, अशोक रेवगडे, अशोक जाधव, कांतिल्ला गायधनी, रमेश चेवरे आदींसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.