Sunday, May 5, 2024
Homeजिल्हा'खड्डे मुक्त नाशिक - भ्रष्टाचार मुक्त नाशिक' स्वाक्षरी मोहिम

‘खड्डे मुक्त नाशिक – भ्रष्टाचार मुक्त नाशिक’ स्वाक्षरी मोहिम

गणेशोत्सव सजावट व फोटो पोस्टर स्पर्धेचे आयोजन

नाशिक
: नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून/‌महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त आहेत. शहरातील व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरीक सातत्याने पालिकेकडे आर्जवे करीत आहेत. विविध संस्था, संघटना, कार्यकर्ते पालिकेला वारंवार निवेदने देत आहेत; आंदोलने करत आहेत. परंतु पालिकेच्या निर्ढावलेल्या अधिका-यांवर यांचा काही परिणाम होताना दिसत नाही, असेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने म्हटले आहे.

खरेतर, नाशिक शहराचा समावेश देशातील शंभर ‘स्मार्ट शहरे’ करण्याच्या यादीत करण्यात आला असून त्यासाठी केंद्र शासनाने भरीव आर्थिक मदत केली आहे. पण, तितकाच खर्च पालिकेला जनतेच्या कराच्या पैशातून करावा लागला आणि लागत आहे. या माध्यमातून शहरातील रस्ते, वाहतूक, पार्कींग व्यवस्था ‘स्मार्ट’ करण्यासाठी केंद्र शासनाने नीधी देखील दिला आहे. महापालिकेने कोट्यावधी रूपयांची भांडवली गुंतवणूक केली आहे. पण अधिकारी, ठेकेदार व काही नगरसेवकांमुळे ही भांडवली गुंतवणूक अर्थात जनतेच्या कराचा पैसा खड्ड्यात गेला आहे.

महापालिकेतील बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी, काही भ्रष्ट नगरसेवक व लुटारू ठेकेदार यांची साखळी रस्त्याच्या धंद्यातून सामान्य जनतेच्या कराच्या पैशावर डल्ला मारत आहे. त्यांना प्रतिबंध करण्याची तयारी सत्ताधा-यांनी न दाखवल्याने ही निर्ढावलेली मंडळी आता तर नागरीकांच्या जीवावरच उठली आहेत. खड्डयांना चुकवताना रोज‌ अपघात घडत आहेत. वयोवृध्द, अपंग, आजारी व्यक्तींना खड्ड्यांच्या रस्यावरून जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. खड्ड्यऻमुळे वाहनांची गती मंद झाल्याने ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होणे नित्याचेच झाले आहे. याचा परिणाम शहरातील उद्योग, व्यापारावर होत असून विकासाची चाके खिळखिळी होत आहेत, असेही भाकपने म्हटले आहे.

सामान्य जनतेचा आक्रोश थांबविण्यासाठी नवीन आयुक्तांनी आदेश दिले आहेत. करारानुसार नवीन रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३वर्षाच्या आत दायित्व (डिफेक्ट लायबिलिटी ) संबंधित ठेकेदारांची असते. पण, असे असताना पालिका अधिका-यांनी आपत्कालीन निधी देऊन पालिकेच्या तिजोरीतून करोडो रूपयांची तरतूद करून ते खड्डे बुजवून घेतले व ठेकेदारांना पाठीशी घातले. परंतु, पावसाळ्यात या बुजविलेल्या खड्डयांतील मुरूम, गट्टू वाहून गेले व एकप्रकारे पुन्हा एकदा ठेकेदारांनी पालिकेला फसविले. मनपा आयुक्तांनी कराराप्रमाणे खड्डे भरून न देणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला खरा पण महापालिकेच्या बा़धकाम विभागातील भ्रष्ट अधिका-यांना शिक्षा कोण करणार असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही नाशिककर जनतेसाठी या प्रश्नावर व्यापक जनआंदोलनाला सुरूवात केली आहे, संपूर्ण शहरात सह्यांची मोहिम राबवून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येत आहे, त्यासोबतच गणेश जयंतीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी खड्डेग्रस्त नाशिककरांची व्यथा देखाव्यांच्या स्वरूपात मांडावी यासाठी गणेशोत्सव सजावट स्पर्धा व फोटो पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये ५ हजार, द्वितीय रुपये ३ हजार, तृतीय रुपये २ हजार व सर्व सहभागी मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येईल. फोटो-पोस्टर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये ५ हजार, द्वितीय रुपये ३ हजार, तृतीय रुपये २ हजार व सर्व सहभागी मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येईल. फोटो पोस्टर स्पर्धेत सहभागी नागरिकांनी तल्हा शेख, आयटक कामगार केंद्र, मेघदूत कॉम्प्लेक्स, सीबीएस, नाशिक सदर पत्त्यावर पाठवावेत. तसेच, दोन्ही स्पर्धांसाठी नोंदणी करण्याकरिता ९४२११७६४८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्वसामान्य नाशिककरांनी आपले खड्ड्यांचे अनुभव गणेशोत्सव देखाव्यांच्या माध्यमातून तसेच फोटो पोस्टर स्वरूपात व्यक्त करून सदर जनचळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नाशिक शहर कौन्सिल मार्फत करण्यात आले आहे.

यावेळी भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅम्रेड राजू देसले, राज्य कौन्सिल सदस्य महादेव खुडे, शहर सेक्रेटरी तल्हा शेख, दत्तू तुपे, विराज देवांग, भीमा पाटील, पद्माकर इंगळे, डाॅ.रामदास भोंग, कैलास मोरे, राहूल अढांगळे, प्राजक्ता कापडणे, सुरेश गायकवाड, पूनमचंद शिंदे, नितीन शिराळ, सचिन आल्हाट, तात्याराव थोरात, रवि उल्हारे आदींसह उपस्थित होते.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय