Thursday, April 25, 2024
HomeNewsआशिया कप : भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा ५ गडी राखत दणदणीत...

आशिया कप : भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा ५ गडी राखत दणदणीत विजय

नवी दिल्ली : आशिया कप मालिकेतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

दुबईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला दिडशेच्या आतच रोखले. पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर ऑलआऊट झाला. तर भारताने १९.४ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

हार्दिकने सिक्स मारुन विजय मिळवून दिला खरा, पण सामना त्याआधीच्या १९ व्या षटकात फिरला. १२ चेंडूत २१ धावांची गरज होती. हॅरिस रौफ १९ वी ओव्हर टाकत होता. त्या षटकात पंड्याने तीन चौकार मारले. तिथे सामना पाकिस्तानच्या हातून निसटला. अखेरच्या षटकात ६ चेंडूत ७ धावांची गरज होती. अखेर हार्दिकनेच मॅच संपवली. त्याने १७ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ३३ धावा केल्या. तर सलामीवीर मोहम्मद रिझवानने ४२ चेंडूत ४३ धावा केल्या.

या सोबतच अष्टपैलू हार्दिक पंड्याने मधल्या षटकांमध्ये तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने चार विकेट घेतल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय