पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : समाजसेवा फाउंडेशन, पुनावळे यांच्या माध्यमातून माध्यमातून श्रीमती अनुसया उच्च माध्यमिक विद्यालय पुनावळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. (Plantation of trees at Smt. Anusaya Higher Secondary School Punawale)
यावेळी माजी सैनिक विक्रम दर्शले, संतोष भुजबळ, प्रकाश लोहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक यांनी फाउंडेशन ने दिलेली झाडे आम्ही जगू , झाडे लावणे ही काळाची गरज आहे. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. फाउंडेशनचे सदस्य नरेंद्र रत्नपारखी यांनी पर्यावरण विषयी मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी उपस्थित प्रल्हाद भाऊ ओव्हाळ,विश्वास ओव्हाळ, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, नगरसेविका रेखा दर्शले, प्रदीप दर्शले, राजू पेठे, महावीर गरड, माणिक भोसले, यशवंत निकम, नागेश भिंगोले मनोज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

