Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभारतरत्न जे.आर.डी. टाटा यांच्या जयंतीनिमित्त 118 झाडे लावून वृक्षारोपण संपन्न

भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांच्या जयंतीनिमित्त 118 झाडे लावून वृक्षारोपण संपन्न

पिंपरी चिंचवड : भंडारा डोंगरावर भारतरत्न जे.आर. डी टाटा यांची 118 वी जयंती 118 देशी झाडे वड, लिंब, आंबा, चिंच, पिंपळ ही देशी 118 झाडे लावून संपन्न करण्यात आली. वृक्षदायी प्रतिष्ठान देहूगाव ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज तुकाराम महाराजांचे यांचे वंशज यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्स 709 जिव्हाळा परिवार पुणे आणि वृक्षदायी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

लोकांमध्ये वृक्षारोपणा विषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून भंडारा डोंगर प्रवेशद्वारापासून ते वृक्षारोपणाच्या जागेपर्यंत सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडीमध्ये ह.भ.प. आव्हाड महाराज यांच्या भजनी मंडळाचे पथक सर्वात पुढे होते. त्यानंतर टाटा मोटर्सच्या कुटुंबीयांमध्ये महिला भगिनी, छोटी मुले, सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व कामगार बंधू समवेत 350 जणांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर वृक्षपूजन करण्यात आले. यावेळी समाजसेविका शारदा मुंडे यांनी आईचे काळीज यावर व्याख्यान दिले.

त्यावर बोलताना मुंडे पुढे म्हणाल्या की, आई जशी आपल्या मुलाची काळजी घेते तसे झाडे सुद्धा आयुष्यभर आपली काळजी घेतात. ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांचे प्रबोधन, मोरे महाराज यांचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे कशी आहेत, हे तुकाराम महाराज यांच्या अभंगातून त्यांनी सर्वांना पटवून सांगितले.

यावर सांगताना तुकाराम महाराजांचे दहावे वंशज शिवाजी मोरे महाराज म्हणाले की वृक्षदायी आई आणि दाई ज्या प्रकारे आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याप्रमाणे आम्ही या झाडाचं संगोपन करतो तीन ते पाच वर्षे या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांना पाणी त्यांची योग्य ती निगा ठेवून ही झाडे मोठी केली जातात. आतापर्यंत भंडारा डोंगरावर नऊ हजार झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे या वृक्षारोपणामध्ये टाटा मोटर्स दरवर्षी 100 म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या ग्रुपने 500 झाडे लावलेली आहेत. जिव्हाळा मित्र परिवार ई ब्लॉक यामध्ये मागे नाही त्यांनीही आज 118 झाडे लावून आजच्या उपक्रमात आपला खारीचा वाटा उचलला. तसेच या झाडांची पाण्याची सोय व्हावी म्हणून पाच हजार 5000 लिटरची एक पाण्याची टाकी महाराजांच्या वृक्षदायी या संस्थेला सप्रेम भेट देण्यात आली. त्यामुळे उन्हाळ्यात या झाडांना पाणी घालण्यास मदत होईल.

या कार्यक्रमाचे नियोजन श्रीकांत कदम, जयवंत तावरे, हंसराज शेलार, संभाजी महींद, किरण कांबळे, विश्वनाथ गवळी, उत्तमराव चौधरी, रवींद्र निकम, शिवाजीराव कणसे, गणेश मुंगसे, शहाजी नरे, प्रवीण डाके, विजय वाघोले, अशोक भोर, अमोल पाटील, अजित पाटील, रवींद्र शिंदे, लोंढे, शरद रडके, देशमाने, विकास पिंगट, जितेंद्र नारखेडे, संभाजी महिंद, दत्तात्रय कदम, बसवराज इंगळगी, बाळासाहेब राक्षे यांच्या समवेत टाटा मोटर्स यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन केले. कदम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले. किरण कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय