Saturday, May 4, 2024
Homeजिल्हापिंपरी : वुई टूगेदर संस्थेचे अनाथ आश्रम, निवारा केंद्राला उबदार कपड्यांचे वितरण

पिंपरी : वुई टूगेदर संस्थेचे अनाथ आश्रम, निवारा केंद्राला उबदार कपड्यांचे वितरण

पिंपरी चिंचवड : शहरात गेली तीस वर्षे कार्यरत असलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या वुई टूगेदर फाउंडेशन (WE TOGETHER FOUNDETION) या संस्थेने विकास अनाथ आश्रम, चिखली येथील ५० हुन जास्त अनाथ बालकांना उबदार ब्लॅंकेट, कपडे, साड्या यांचे वितरण केले. यावेळी सोनाली मन्हास, मेघना बेरी, सलीम सय्यद, मेघना भोसले, शैलजा कडुलकर, स्मिता जाधव, सोनाली शिंदे, सोनाली डावरे, भावीन भंडारी होते.

अनाथ आश्रमाचे संचालक माऊली माऊली हारकळ यांनी सांगितले की, मी स्वतः अनाथ होतो, त्या वाईट परिस्थितीतुन बाहेर पडलो, आई-बाप नसलेली मुलेमुली हतबल, असहाय्य असतात. इथे आम्ही त्यांना स्वावलंबी बनवतो, शिक्षण देतो. दानशूर नागरीक आपला वाढदिवस अन्नदान करून इथेच साजरा करतात. तुमच्यासारख्या समाजातील दयाळू, दानशूर लोकांमुळे हा आश्रम गेली दहा वर्षे मी  चालवत आहे. आई बाप होऊन  या सर्व मुलांचे सज्ञान होईपर्यंत पुनर्वसन करणे मला शक्य होते, कारण या समाजात दातृत्वाची कमतरता नाही.

संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपाच्या सावली बेघर निवारा केंद्रातील माता, भगिनी, वृद्ध, विकलांग, विपन्न नागरिकांना साड्या, पॅन्ट शर्ट, उबदार कपड्यांचे वितरण स्वप्नील जेवळे, दिलीप पेटकर यांनी केले.

निवारा केंद्राचे संचालन करणाऱ्या रिअल लाईफ, रिअल पीपल संस्थेचे अध्यक्ष एम.ए. हुसेन आणि समाज विकास अधिकारी गौतम थोरात यांनी सांगितले की, पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियाना अंतर्गत महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या सहकार्याने आमचे स्वयंसेवक येथील बेघर, विपन्न लोकांची सेवा शुश्रूषा करतात.रस्त्यावर खितपत पडलेल्या नागरिकांना आम्ही निवारा, अन्नवस्त्र, औषधे ई देतो. स्वयंसेवी संस्था या ठिकाणी खूप मदत करतात. हा तात्पुरता निवारा आहे. विविध क्षेत्रातील सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यात आम्ही यशस्वी होत आहोत.

वुई टूगेदर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल जेवळे यांनी सांगितले की, या औद्योगिक नगरीतील हजारो दानशूर नागरिकांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात वंचित,उपेक्षितांना अन्नधान्य, औषधे ई स्वरूपात खूप मदत केली आहे. निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून सेवाभावी कार्यक्रम आम्ही करत आहोत.

सोनाली मन्हास यांनी सांगितले की, हिवाळ्यात गोरगरिबांना आम्ही मदतीचे आवाहन केले होते. रुपाली भस्मे, स्नेहा पर्वतकर,संध्या खामकर, दत्तात्रय सातव, नयना कुलकर्णी, अश्विनी हेर्लेकर, गणेश सर्जीने ,यश लांडगे, लताबेन सुरती, स्वाती तांबे, मिलिंद हेर्लेकर, अरविंद गुजराती, विनीत गुजराती, दीपक कुंजीर, सबा सय्यद, जावेद शेख, महंमद शेख, कुणाल गायकवाड, पुष्पा देशमुख, विजय रणदिवे, उर्जित पानशेट्टी, सदाशिव गुरव या नागरिकांनी आर्थिक योगदान दिले आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय