पिंपरी चिंचवड : शहर अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास सुंदर कांबळे यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी मागासवर्गीयांना संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे केली.
सुंदर कांबळे सध्या असंघटित कामगार काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहेत. या माध्यमातून श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे. गेली १५ वर्षांपासून ते काँग्रेसचे काम करत आहेत. पूरग्रस्तांना मदत मिळवून देणे, दवाखान्यासाठी मदत करणे, नागरिकांच्या गंभीर समस्या सोडविण्यासाठी आंदोलन करुन, मोर्चा काढून सर्वसामान्य जनतेला न्याय व हक्क मिळवून दिला आहे.
कांबळे म्हणाले, मागील दोन पंचवार्षीक निवडणूकी मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक निवडून गेला नाही. एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. प्रा. रामकृष्ण मोरे नंतर शहरातील काँग्रेस ही पूर्णपणे लयास गेली. आज शहरात जे खासदार, आमदार, नगरसेवक आहेत ते पूर्वीचे काँग्रेसचे होते आता मात्र ते दुस-या पक्षात जावून सत्तेत गेले.
पिंपरी चिंचवड शहरात 92 झोपडपट्ट्या आहेत व तेथील राहणारे लोक हे बहुसंख्यने मागासवर्गीय आहोत व काँग्रेसला माननारे आहेत. तसेच पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत 5000 कंपन्या आहेत व लाखो काम करणारे असंघटित कामगार आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक कार्यक्रम घेणे, संघटन वाढवणे, पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम कांबळे करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपद मिळावे, अशी मागणी सुंदर कांबळे यांनी केली आहे. पत्रक देतेवेळी असंघटित कामगार काँग्रेस महिला विभाग समन्वयक शितलताई कोतवाल, ड्रायव्हर संघटना विभाग, समन्वयक आयु. नवनाथ डेंगळे, लघु उद्योग व्यापार संघटनेेेचे समन्वयक आयु. विजय शिंदे, हातगाडी पथारी टपरी संघटनेचे समन्वयक अझहरूद्दीन पुणेकर, माथाडी कामगार संघटना विभागाचे समन्वयक आयु. नितीन पटेकर, ऑटो रिक्षा जिल्हा समन्वयक, आयु. दिलीप साळवे, सोशल मिडीया जिल्हा समन्वयक मोहन उनवणे उपस्थित होते.