Friday, November 22, 2024
Homeजिल्हाPimpri Chinchwad News : प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत 27 फेब्रुवारीला

Pimpri Chinchwad News : प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत 27 फेब्रुवारीला

पिंपरी चिंचवड : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सोडत दि.२७  फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे शुभहस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे या राहतील. तसेच यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे तसेच प्रमुख उपस्थिती खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे आण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेस महापालिका सभेने ठराव क्र .५१९ नुसान मान्यता देण्यात आली आहे. तर १७/०८/२०२० ते १०/१०/२०२० या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविणेत आले होते. या योजनेकरिता एकूण ४७८७८ इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४७७०७ अर्ज पात्र ठरलेले आहेत.

सदर प्रकल्पाच्या अंतर्गत चव्होली १४४२, रावेत – ९३४ व बोहाडेवाडी – १२८८ अशा एकुण ३६६४ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या योजनेकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण असेल. या योजनेकरिता ३६६४ सदनिकेची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामध्ये सदनिका धारकास प्रथमतः १० % स्व:हिस्सा भरावा लागेल. या योजनेची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook ( Link www.facebook.com/pcmcindia.gov.in ) Live YouTube ( Link www.youtube.com/PCMCINDIA ) द्वारे दाखविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून उपस्थित न राहता वरील प्रमाणे दिलेल्या लिंकवर जावून पहाण्याचे आवहान करण्यात आले आहे.

सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे व सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय