Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंंपरी चिंचवड : जनवादी महिला संघटनेच्या धान्य बँकच्या वतीने गरजूंंना धान्य वाटप

पिंंपरी चिंचवड : जनवादी महिला संघटनेच्या धान्य बँकच्या वतीने गरजूंंना धान्य वाटप

पिंपरी चिंचवड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या धान्य बँकच्या वतीने गरजूंंना धान्य वाटप करण्यात आले.

जनवादी महिला संघटनेने 2020 पासून धान्य बँक सुरू केली. आपत्कालीन काळात सामान्य आणि गोरगरीब कुटुंबाचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत. यासाठी संघटनेची टीम घरोघरी धान्य गोळा करते. 2020 साली कोरोनाच्या लाटेमध्ये शहरातील घर कामगार, विधवा, परितकत्या, अपंग, रिक्षाचालक या 4 हजाराहून जास्त गरजू कुटुंबाना जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले होते.

यावर्षी च्या कोरोना लॉकडाऊन मध्ये 345 कुटुंबाना तांदूळ, गहू याचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर, गौरी साकुरे, सोनाली मन्हास, गुलनाज शेख, सुषमा इंगोले, शेहनाज शेख, योगिता कांबळे, अमिन शेख यांनी हा उपक्रम सुरू केला.

एप्रिल, मे या दोन महिन्यात हरगुडे वस्ती, जाधववाडी, पिंपळे सौदागर, आकुर्डी, बिजलीनगर या परिसरातील गरजू ना धान्य वितरित करण्यात आले. शहरातील संवेदनशील मध्यमवर्गीय कुटुंबांनी तसेच विविध सोसायट्यांं मधील कुटुंबांनी धान्य दान करून या कार्याला मदत केली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय