Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त बसव सायक्लोन रॅली

पिंपरी चिंचवड : महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त बसव सायक्लोन रॅली

पिंपरी चिंचवड : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने, निगडी येथे असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. मल्लिकार्जुन प्रतिष्ठान आणि महात्मा बसवेश्वर पुतळा समितीच्या वतीने आज सकाळी बसव सायक्लोन ही सायकल रॅली काढण्यात आली. सुमारे ४०० नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. २५ किलोमीटरची ही रॅली होती. या रॅलीत अनेक महिलांनी देखील सहभाग घेतला होता.

सकाळी दहा वाजता बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली. याप्रसंगी महात्मा बसवेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, अण्णा राय बिरादार, गुरुराज चरणी मठ, शिवाजी साखरे, दत्तात्रय बहिरवाडे, एस बी पाटील, वाळके, दलाल, राजू गुणवंत इ. मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय