Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदीत माऊलींचे बळीराजा पांडुरंग चंदन उटी रूपदर्शन

आळंदीत माऊलींचे बळीराजा पांडुरंग चंदन उटी रूपदर्शन

माऊली मंदिरात चैत्र गौरी पूजन उत्साहात

आळंदी/अर्जुन मेदनकर
– श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करत संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्रींचे बळीराजा पांडुरंग वैभवी रूप साकारले.श्रींचे वैभवीरूप पाहण्यासाठी माऊली मंदिरात तसेच ठिकठिकाचे मंदिरांत दर्शनास गर्दी केली.

अक्षय तृतीये निमित्त आळंदी देवस्थान आणि स्वकाम सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष सुनील तापकीर आणि सर्व स्वकाम सेवक साधकांनी उटीचे नियोजन करीत चंदन उटी सेवा रुजू केली. मंदिरात चैत्र गौरी पूजन,चंदन उटी दर्शन उत्साहात झाले. महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून श्रींचे दर्शन घेत हळदी-कुंकू घेतले. आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरी पूजना निमित आकर्षक सजावट करण्यात आली होती. चैत्र गौरीचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास महिला, भाविक, नागरिकांनी गर्दी केली.

श्रीचे गाभाऱ्यात अक्षय तृतीये निमित्त संजीवन समाधीवर चंदन उटीतुन माऊलींचे बळीराजा पांडुरंग रूप परिश्रम पूर्वक अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी साकारले. विविध वस्त्रालंकारांनी सजलेले श्रींचे रूप दर्शनास भाविकांनी गर्दी केली. आळंदी परिसरात साडेतीन मुहूर्ता पैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत विविध नवीन उपक्रम आणि वाहन खरेदी निमित्त वाहनाची मंदिरा बाहेर पूजा मोठ्या उत्साहात करण्यात आली. अक्षय तृतीये निमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, पूजा आणि भाविकांचे दर्शन तसेच महिलांचा हळदी-कुंकू असे कार्यक्रम उत्साहात झाले.

याप्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त विधीतज्ञ विकास ढगे पाटील यांनी श्रींचे दर्शन घेतले. या प्रसंगी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक यांनी संस्थांनच्या प्रथा प्रमाणे धार्मिक महत्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली. विना मंडपात वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवचन सेवा झाली. संजय लवांडे, सोमनाथ लवंगे, महेश गोखले आदींनी मंदिरातील तसेच भाविकांचे दर्शनाचे नियोजन केले.

येथील नव्याने भव्य दिव्य विकसित करण्यात आलेल्या श्री लक्षशांती गणेश मंदिरात श्रींचे मंदिर गाभाऱ्यातलक्षवेधी आंब्यांची सजावट करण्यात आली. अक्षय तृतीये निमित्त परिसरातील नागरी , भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. यासाठी श्रींचे मंदिर निर्माते शांता येळवंडे, लक्ष्मण येळवंडे, सचिन येळवंडे, संतोष येळवंडे, सागर येळवंडे आणि येळवंडे परिवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शनास तसेच पूजा, आरास पाहण्यास गर्दी केली. भाविकांना मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी श्री व सौ शांता लक्ष्मण येळवंडे परिवाराने भाविकांचे स्वागत केले.

येथील श्री संत गोरोबाकाका समाधी मंदिरात अक्षय तृतीया निमित्ताने भगवान परमात्मा श्री विठ्ठल अवतार चंदन उटी परिश्रम पूर्वक साकारण्यात आली. यासाठी संत गोरोबा काका यांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते आणि त्यांचे सहकारी बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रम घेतले. यावर्षी प्रथमच श्री संत देहू नगरीत संत तुकाराम महाराज जन्मस्थळ मंदिरात श्री विठ्ठल मंदिरात श्रीना चंदन उटी लेप करण्यात आला. या उटी साठी आळंदीतील सेवक बल्लाळेश्वर वाघमारे यांनी सेवा रुजू करीत चंदन उटी साकारली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय