Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोनापिंपरी चिंचवड : भीती बाळगू नका, लसीकरण करून घ्या - आयुक्त राजेश...

पिंपरी चिंचवड : भीती बाळगू नका, लसीकरण करून घ्या – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवड : मनपा आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पिंपरीच्या जिजामाता रुग्णालयामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.

ते म्हणाले की, कोणतीही काळजी किंवा भीती बाळगू नये, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 60 वर्षावरील सर्व नागरिकांना महापालिका लस देत आहे. तसेच 45 ते 60 वयोगटातील इतर आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. मनपाचे डॉक्टर्स, नर्सेस प्रभाग अधिकारी, कर्मचारी वर्ग, तसेच पोलीस कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण होत आहे. लसीकरण करून घेत आहेत.

त्यासाठी शहरात सध्या आठ प्रभागात लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. अजून 50 केंद्रे स्थापित करण्यात येतील असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शहरात 56 हजार 273 नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी 46 हजार 82 नागरिकांनी मनपाच्या केंद्रावर मोफत लसीकरण करून घेतले आहे.


शहरातील प्रमुख लसीकरण केंद्र खालीलप्रमाणे :

१. यमुनानगर रुग्णालय – डॉ. प्रकाश तायडे 9922501326अंकुश चौक, यमुनानगर, पुणे.

२. नवीन जिजामाता रुग्णालय – डॉ. संगिता तिरुमणी 9922501301 जयहिंद शाळेसमोर, पिंपरीगाव रोड, पिंपरी.

३. नवीन भोसरी रुग्णालय – डॉ. शैलजा भावसार 9922501325 अकुंशराव लांडगे सभागृहाच्या पाठीमागे, भोसरी.

४. वाय सी एम रुग्णालय – डॉ. तृप्ती सागळे 8888844208, १ ला मजला, चाणक्य सभागृह, य.च.स्मृ. रुग्णालय, संत तुकारामनगर, पिंपरी १८.

५. पिंपळे निलख दवाखाना – डॉ. सुनिता इंजीनिअर 9922501340, पिंपळे निलख गावठाण, मनपा शाळेसमोर, औंध कॅम्प पुणे २७.

६. कासारवाडी दवाखाना – डॉ. विजया आंबेडकर, 9922501353 तळमजला, कासारवाडी करसंकलन इमारत, कासारवाडी, पुणे.

७. प्रेमलोक पार्क दवाखाना – डॉ. सुनिल जॉन, 9922501331, पोलिस आयुक्तालया समोर, दळवीनगर, चिंचवड.

८. ईएसआयएस रुग्णालय – डॉ. सुनिता साळवे, 9881161255, ESIS, मोहननगर, चिंचवड पुणे

९. तालेरा दवाखाना – डॉ. सुनिल जॉन 9922501331

संबंधित लेख

लोकप्रिय