Sunday, May 19, 2024
Homeराज्यसलग नवव्या दिवशी पेट्रोल,डिझेलच्या किंमती वाढ

सलग नवव्या दिवशी पेट्रोल,डिझेलच्या किंमती वाढ

महाराष्ट्र जनभूमी :-  सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज वाढविण्याचा सपाटा रविवारी सलग नवव्या दिवशीही सुरू ठेवला. ताज्या वाढीने पेट्रोल आजपर्यंत ५ रु. प्रति लिटर, तर डिझेल ४.८७ रु. प्रति लिटर अधिक महाग झाले आहे. 

         सुमारे ८२ दिवसांनंतर कंपन्यांनी पुन्हा इंधनाचे दर रोज बदलणे सुरू केले. तेल कंपन्यांनी देशातील इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार दररोज बदलण्याची पद्धत जून २०१७ मध्ये सुरू केल्यापासून रविवारी केलेली दरवाढ ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ आहे.

          कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतंरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या किंमती दोन दशकातील निचांकी आल्या तरी या कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना न देता किमती कायम ठेवल्या आहेत.

           या काळामध्ये आतंरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झालेल्या दराचा लाभ ग्राहकांना न मिळता कंपन्यांनी आपला नफा वाढविण्याला प्राधान्य दिलेले दिसले. सरकारी कंपन्यांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांना आता कोरोना सोबत महागाईचा झळा सोसाव्या लागत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय