Sunday, May 5, 2024
HomeNewsPCMC:व्हिडीओ:संगणक प्रणाली संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षणातून महिला,मुलींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील-जयंत कुलकर्णी

PCMC:व्हिडीओ:संगणक प्रणाली संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षणातून महिला,मुलींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील-जयंत कुलकर्णी

विपला फाउंडेशन कौशल्य व व्यक्तिमत्व विकास केंद्राचा प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर-असंघटित,आर्थिक मागास घटकातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेल्या गरजू महिला मुलींना पारंपरिक किंवा अंगमेहनती कामातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही,आज ज्यांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर संबंधित किमान कौशल्य आहे,त्यांना शहरातील कमर्शियल,रिटेल,बीपीओ किंवा ऑनलाईन क्षेत्रात जॉब उपलब्ध आहेत.ते जॉब मिळवण्यासाठी सॉफ्ट स्किल संबंधित प्रशिक्षण आत्मसात करावे,असे वुई टूगेदर फाउंडेशन,पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थेचे समन्वयक जयंत कुलकर्णी यांनी पिंपरी येथील प्रमाणपत्र वितरण समारंभात मार्गदर्शन करताना सांगितले.

स्किल इंडिया अभियानामूळे कुशल मनुष्यबळ विकास होईल

भारत सरकारने कुशल मनुष्यबळ विकासावर भर द्यायचे ठरवले आहे,विपला फाउंडेशन,स्पीकवेल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल इंडिया व एनडीसीचे उपक्रम प्रा.वैशाली गायकवाड,प्रा.दीपक जाधव हे शिक्षक दांपत्य मोफत मुलींना ट्रेनिंग देत आहे,त्यांना जॉब मिळवून देत आहे,हा महिला,मुलींच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाचा स्तुत्य उपक्रम आहे,स्किल इंडिया अभियानामुळे युवक युवतींची संगणक कौशल्ये विकसित होतील,असे पदाधिकारी जयंत कुलकर्णी यांनी प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रशिक्षणार्थीचे कौतुक करताना सांगितले.


आर्थिक,सेवा क्षेत्रातील रोजगार संधींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही राबवतो-प्रा.वैशाली गायकवाड


आर्थिक,रिटेल,सेवा,बीपीओ,बँकिंग,आदी क्षेत्रातील रोजगारसंधींचा लाभ घेण्यासाठी किमान दहावी ते पदवीधर तरुण तरुणींना आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, या उद्देशाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) स्थापन करण्यात आले आहे.
समाजातील गरजू युवक,युवती व महिलांना संगणक प्रणालीतील एम एस ऑफिस,इमेलिंग,बिलिंग तसेच नव्या प्रकारच्या किमान कौशल्याचा नोकऱ्या मिळाव्यात हा उद्देश समोर ठेवून विपला फाउंडेशन,स्पीकवेल स्किल अकॅडमी यांच्या संयुक्त सहकार्याने पिंपरी येथे अल्प उत्पन्न गटातील शिकलेल्या मुली व महिलांना 45 दिवसाचे प्रशिक्षण येथील संगणक लॅब मध्ये मोफत दिले जाते,त्याना शासन मान्य तीन प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतात.असे सॉफ्ट स्किल व व्यक्तीमत्व विकास केंद्राच्या संचालिका प्रा.वैशाली गायकवाड यांनी सांगितले.


या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सलीम सय्यद,अध्यक्ष,वुई टूगेदर फाउंडेशन,कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.


विपला फाउंडेशनचे समन्वयक प्रा.दीपक जाधव सर यांनी सांगितले की,पिंपरी चिंचवड शहरात आमच्या केंद्राच्या वतीने एम एस ऑफिस,स्पोकन इंग्लिश,कम्युनिकेशन स्किल,व्यक्तीमत्व विकास मुलाखतीसाठी विशेष स्किल्स चे अतिरिक्त प्रशिक्षण मोफत दिले जाते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय