Sunday, May 5, 2024
HomeNewsPCMC:पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करा!

PCMC:पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करा!

पिंपरीत पत्रकारांची निषेध सभेत मागणी !


पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका पत्रकार कक्षामध्ये आज सांयकाळी ६ वाजता पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे होते.यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव,पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मिडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे, माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे,ज्येष्ठ समाजसेवक विश्वंभर चौधरी आणि प्रसिद्ध वकील अँड.असीम सरोदे यांच्यावर मागील शुक्रवारी पुण्यात ” निर्भय बनो ” कार्यक्रमाला जात असताना जीवघेणा हल्ला करण्यात आला.या कृत्याचा निषेध करण्यासाठी काल पिंपरी महापालिका पत्रकार कक्षामध्ये निषेध सभा घेण्यात आली. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे,माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी,अध्यक्ष दादाराव आढाव,उपाध्यक्ष गणेश शिंदे,डिजिटल मिडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे,प्रसिध्दी प्रमुख युनूस कातीब,उपाध्यक्ष यशवंत गायकवाड, सह खजिनदार श्रीधर जगताप इत्यादींनी भाषणे केली व प्रत्येकाने निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कडाडून निषेध करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे सेक्रेटरी बाबू कांबळे,सह सचिव मुकुंद कदम,कार्यकारी सदस्य शफिक शेख,लक्ष्मण रोकडे,संतोष जराड, इत्यादी पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते.
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी स्वरूपात निषेध पत्र पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केले तर डिजिटल मिडिया चे समन्वयक मुकेश जाधव यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय