Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:ऑटिझमग्रस्त दिव्यांग मुलांचा मनोविकास करण्यासाठी शाळा चालवणे हे अतिशय कठीण कार्य आहे...

PCMC:ऑटिझमग्रस्त दिव्यांग मुलांचा मनोविकास करण्यासाठी शाळा चालवणे हे अतिशय कठीण कार्य आहे – श्रद्धा शहा

“अभिसार फाउंडेशन “चे वार्षिक स्नेहसंमेलन आनंदात साजरे

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:”अभिसार फाउंडेशन,ही एक सेवाभावी सस्था वाकड येथे गेली काही वर्षे ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांच्या जीवनात सुधारणेसाठी व त्यांचे सर्वांगीण शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी शाळा सुरू केली आहे.
या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन वाकड येथे दि.२४ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी मुलांनी विविध सां्कृतिक कार्यक्रम सादर केले.


“ऊर्जा” दिव्यांग शाळा हा अभिनव उपक्रम आहे.

मूकबधिर,अंध अपंग मुलांना शिकवू शकतो,त्यांच्या बुद्धीचा विकास करू शकतो.पालकांना पण अशा मुलांचे संगोपन करतांना किमान अडचणी येतात.मात्र स्वमग्न किंवा ‘ऑटीझम’ ग्रस्त मुलांना स्वतःचे अस्तित्व कळत नसते,हा आजार नसला तरी पालक अशा मुलामुळे त्यांच्या भविष्यासाठी चिंतित असतात, अभिसार फाऊंडेशन ने “ऊर्जा” दिव्यांग प्रकल्पाच्या माध्यमातून शाळा सुरू करून ‘ऑटीझम’ असलेल्या मुलांचा मनोविकास घडवला,आज ही मुले वार्षिक स्नेह संमेलनामध्ये संस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहे,हे अभिसार फाउंडेशनच्या संस्थापक सदस्यांचे अभूतपूर्व यश आहे,असे स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.लायन श्रद्धा शहा (अध्यक्ष लायन्स क्लब पुणे सहकार नगर)यांनी वाकड येथे सांगितले.


संस्थेच्या कार्याला  सदैव मदत करू

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.लायन श्रद्धा शहा (अध्यक्ष लायन्स क्लब पुणे सहकार नगर ) या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन श्री.अमोल दापूरकर (अध्यक्ष लायन्स क्लब पुणे रहाटणी) यांनी पारितोषिक वितरण समारंभात संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या,ते म्हणाले की,कोणतीही समाजसेवी संस्था विशिष्ट उद्दिष्ट ठेवून काम करत असते, स्वमग्न  मुलांना शिकवणारा त्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी पालक आणि संस्था एकत्र येऊन एक ‘ऑटीझम’ग्रस्त मुलांची
अभिनव शाळा सुरू झाल्यानंतर अनेक अडचणींना  संस्थाचालकांना व  पालकांना सामोरे जावे लागले.ऑटीझम नेमका कोणत्या कारणामुळे उद्भवतो ह्याचे पक्के निदान अजूनही झालेले नाही,या मुलांना विकसित करण्यासाठी सर्वात जास्त मेहनत अभिसार फाऊंडेशन पालकांना संयुक्तपणे घेतली आहे.त्यामुळे या संस्कृतिक कार्यक्रमात या मुलांनी विविध सहभाग घेतला आहे.आम्ही संस्थेच्या कार्याला  सदैव मदत करू.असे लायन अमोल दापूरकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.


या वेळी शिक्षक प्रतिनिधी विकास जगताप,विद्यार्थी प्रतिनिधी श्रुती आढाव,पालक प्रतिनिधी युगंधरा बर्वे व श्रद्धा जाधव सचिव श्री रमेश मुसूडगे, सतीश इंगळे (उपाध्यक्ष),वुई टूगेदर फाऊंडेशन चे जयंत कुलकर्णी,श्रीनिवास जोशी,अनिल शिंदे,उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन करण्यात आले.

या वेळी दिव्यांग (ऑटिझम )  विद्यार्थी पृथ्वीराज इंगळे यांनी ” ईश्वर स्तवन  ” सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झालीया नंतर झुक झुक झुक अगीनगाडी,लकडी की काठी,पडोगे लिखोगे नवाब बनोगे,आमच्या पप्पांनी गणपती आणला, माऊली माऊली,गलतीसे मिस्टेक,अशा गाण्यांवरती दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली. शिक्षिका वैशाली खेडेकर,भाग्यश्री कापसे,हांडे मॅडम यांनी कार्य मार्गदर्शन केले होते.

ओंकार तरडेचे झेबे वादन,विश्व् कांबळेचे जय मल्हार वरील नृत्य झाले,कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण दिव्यांग  विद्यार्थ्यांनी सादर केलेली ” क्रीडा  विश्वातील फॅशन शो ” या साठी मार्गदर्शन केले होते विकास जगताप व ऋषिकेश मुसुडगे यांनी या नंतर लायन श्रद्धा शहा व लायन श्री अमोल दापूरकर,व “वुई टुगेदर फाऊंडेशन “चे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धतील विजेते खेळाडू,उदयमुख खेळाडू ,ऐतिहासिक वेशभूषा,सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक स्वच्छता, नियमित उपस्थिती,शाळेतील वागणूक या यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन  मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या वेळी ” श्रद्धा शहा यांनी  पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनाचे कौतुक केले लायन श्री अमोल दापूरकर यांनी अभिसार फाउंडेशन व लायन्स क्लब रहाटणी यांच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. अहवाल वाचन श्रीमती किन्नरी शहा (कार्यकारी व्यवस्थापिका )यांनी केले सूत्रसंचालन  श्रीमती वैशाली खेडकर,व कापसे बक्षीस वाचन हांडे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री केशव पारखी (अकाउटंट),स्कूल कमिटीचे सदस्य बालवडकर,योगेश दादा,गोपी दादा,कुणाल दादा,मयूर दादा,मारणे मावशी,कांबळे मावशी यांनी संयोजन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय