मर्दानी खेळ, पारंपरिक वेषभूषा करून फेरीचे आयोजन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:च-होलीतील पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल(काळे कॉलनी )येथील संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये इयत्ता दुसरी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य सादर केले.विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी शिवकालीन पात्र साद सादर केले इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून शिवाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची गाथा पोवाडाच्या स्वरूपात इयत्ता पाचवीचा विद्यार्थी यथार्थ इंगळे याने सादर केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून मर्दानी खेळ लाठीकाठी आणि लेझीम सादर केले.शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बालपण ते राज्याभिषेक नाट्य सादरीकरण करण्यात आले.
इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी लावण्या पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणातून शिवचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला.
प्रमुख पाहुणे सतीश नांदुरकर पोलीस निरीक्षक यांनी शिवाजी महाराजांची कायदे सुव्यवस्था व वाहतुकीचे नियम याविषयी भाषणामध्ये माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे सर यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आपल्या भाषणातून मांडून महाजाप्रमाणे आम्ही सर्व विद्यार्थी सर्वगुण संपन्न बनवू.
नवनाथ काळे सर यांनी सुद्धा आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचा पराक्रम दूरदृष्टी याविषयी माहिती दिली त्यांच्या शौर्याची गाथा उलगडून सांगितली ते परस्त्रीला आई समान वागणूक देत्त असल्याचे सांगितले.
ॲड.सचिन काळे शिवाजी महाराजांची जी मूल्य होती ती आम्ही आमच्या मुलांमध्ये उतरण्याचा प्रयत्न करु. तसेच आमची संस्था सुसंस्कृत सुशिक्षित नागरिक घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. असे मार्गदर्शन पर भाषण त्यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सतिश नांदुरकर पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग, तसेच राजीव रणदिवे उप पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग तसेच गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.पालक वर्गाचा सुद्धा कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग होता.कुंदा अनंत काळे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शारीरिक क्रीडा शिक्षक संदेश साकोरे,प्रशांत हराळ,प्रणव साकुंदे,अभिषेक हजारंगे शिक्षिका सौ.आशा थोरात, सपना शिंपी यांनी योगदान दिले मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी काळे कॉलनी येथून शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मश्री वासनकर व वैशाली येडे मॅडम यांनी केले होते.