राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाकडुन यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
पिंपरी चिंचवड / क्रांती कुमार कडुलकर : दि.१२ – महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीचा व पायाभरणीच्या काळात महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य यशवंतरावांनी केले, मात्र आज महाराष्ट्रातील उद्योग व्यापार इतर राज्यात नेऊन मराठी माणसाला बेरोजगार करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, आज यशवंतरावांची पदोपदी आठवण येते, यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राचा लौकिक वाढला, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज चिंचवड येथे कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे अभिवादन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक अशा चोहोबाजुनी राष्ट्राची पायाभरणी सुरू असताना राज्याची अस्मिता जपून नवे आर्थिक स्त्रोत तयार करून सामाजातील उपेक्षित वंचित वर्गांना नव्या रचनेत समान संधी देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण करून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम पाहिले आदर्श मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यानी केले.
विविध घटकांसाठी योजना राबवत असताना अविकसित भागांचा, गावांचा आधी विचार केला पाहिजे.औद्योगिकीकरणाबाबत ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी असा त्यांचा मानस होता, नंतर शरद पवार यानी शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालत कामगारांना काम मिळालेच पाहिजे, ते केवळ शहरांकडे धाव न घेता इतर ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापिले. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वाचे आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक तसेच आर्थिक विकासाच्या योजना त्यांनी प्रत्यक्षात आणल्या.
पिंपरी चिंचवड सह पुण्यात आय टी सिटी सह, औद्योगिक विकासात महाराष्ट्र अग्रस्थानी असावा, ही यशवंतराव चव्हाण यांची परंपरा शरद पवार यांनी पुढे चालवली. यशवंतरावांचे विचार आजही प्रेणादायी आहेत.असे कामगार नेते यांनी काशिनाथ नखाते यांनी सांगितले.
राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, किरण साडेकर, चंद्रकांत कुंभार, बालाजी बिरादार,रामा गायकवाड,सालिम डांगे, अश्विनी मोरे, अर्चना कांबळे, अंजना गायकवाड, संजय कांबळे, आदी उपस्थित होते.