पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि. २०-सोमवारी आयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरात श्री राम लल्ला ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त देशभर विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भक्तिमय, आनंदमय, वातावरणात साजरे होत आहेत.
असाच एक विश्व विक्रमी कार्यक्रम बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवकेंद्राच्या वतीने रविवारी (दि.२१)सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.त्याचे उद्घाटन अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
बाणेर येथील रायकर फार्म, सर्व्हे नंबर १२६, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया जवळ, प्रभावी टेक पार्क शेजारी, बाणेर, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.या ठिकाणी अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वात मोठी विश्व विक्रमी निमंत्रण पत्रिका साकारण्यात आली आहे.या कार्यक्रमाची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. जगभरात १२३ देशात ध्यानधारणा शिकविणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या या भव्य धार्मिक कार्यक्रमांत रामभक्तांनी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित राहावे असे आवाहन सकाळी १० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक बी.के.डॉ.त्रिवेणी दीदी, बी. के. डी. सुवर्णा दीदी व १८२ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय व या विश्व विक्रमाचे संयोजक बी. के. डॉ. दीपक हरके यांनी केले आहे.