वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शासकीय तारखेनुसार सगळीकडे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. वुई टुगेदर फाउंडेशनच्या (WE TOGETHER FOUNDATION) वतीने काकडे पार्क चिंचवड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. (PCMC)
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले. फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी छत्रपती शिवराय यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले व वुई टुगेदर फाउंडेशन विषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.
वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी शिवजयंतीला वेगळा उपक्रम घेतला जातो. या वर्षी गडकिल्ले संवर्धन, इतिहास जपणारे व शक्य तेवढा शिवराय, संभाजी राजे, यांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणारे, तसेच जेष्ठ नागरिक यांचा शाल, श्रीफळ,फुले देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी वूई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सामूहिक शिव वंदना व घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रजागर प्रतिष्ठानचे राहुल ताम्हणकर, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीच्या कालखंडात गड, किल्ले बांधले. त्यांचे रक्षण करण्यासाठी आपले रक्त सांडून बलिदान केले आहे. आम्ही दुर्ग भ्रमंती साठी जातो तेव्हा फक्त ट्रेकिंग हा एकमेव उद्देश नसतो. तर आपल्या गड किल्ल्यांचा इतिहास तरुणाईला समजावून सांगत असतो, स्वराज्य निर्मिती मध्ये शिवरायांचा उद्देश काय होता, हे समजून घेतले पाहिजे.
तानाजी मालुसरे, येसाजी कंक सारखे योद्धे प्राणाची बाजी लावून गड किल्ल्यांचे शत्रूपासून रक्षण केले आहे. हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. शिवरायाचे मावळे कोण होते. ते तुमचे आमचे पूर्वज होते. ते वेगळे कोण नव्हते. गड किल्ले यांचे संवर्धन करताना छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचा मुख्य उद्देश आजही आपण समजून घेतलेला नाही.
त्यामुळे गड किल्ले संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आम्ही राष्ट्र जागृतीसाठी मोहीम सुरू केली आहे. असे राष्ट्रजागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल ताम्हणकर यांनी वुई टुगेदर फाउंडेशनच्या शिवजयंती सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त केले. (PCMC)
राष्ट्रजागर प्रतिष्ठान कायम गडकिल्ले संवर्धन व ऐतिहासिक माहिती अनेकांना देतात म्हणून या प्रतिष्ठानचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उत्तम विटुळे, सखाराम देशपांडे, आहिरे काका, विद्याधार देशपांडे, अशोक सोलणकर, मच्छिन्द्र थोरवे, मोरेश्वर देशपांडे, पांडुरंग कुलकर्णी, काशिनाथ देव, मिलिंद इनामदार, मोरेश्वर देशपांडे मान्यवरांना शिवजयंती निमित्त विशेष गौरव करण्यात आला.
माजी अध्यक्ष सलीम सय्यद, उपाध्यक्षा सोनाली मन्हास, खजिनदार दिलीप चक्रे, रवींद्र काळे, दारासिंह मन्हास, सदाशिव गुरव, सुरेंद्र जगताप, अनिल पोरे, विलास गटने, शंकर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
फाउंडेशन सचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी उपलब्ध करून दिलेले एनर्जी ड्रिंक( O R S) उपस्थित सर्वांना वाटप करण्यात आले.
उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सूत्रसंचालन केले. तर माजी अध्यक्ष सलीम सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.

हे ही वाचा :
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!
‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?
महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट होणार जागतिक वारसास्थळ
धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री