Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री

Water Mixed With Petrol : पिंपरी-चिंचवड शहरातील शाहूनगर परिसरात असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम (HP) संचालित भोसले पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन भेसळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पंपावर विकले जाणारे इंधन तब्बल ८०% पाणी आणि केवळ २०% पेट्रोल (Water In Petrol) असल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Fuel Scam)

---Advertisement---

वाहनचालकांची फसवणूक; इंजिनमध्ये बिघाड

या पंपावर इंधन भरल्यानंतर अनेक वाहनचालकांच्या वाहनांमध्ये तात्काळ बिघाड झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अगदी एक ते दोन लिटर पेट्रोल भरल्यावरही वाहन अचानक बंद पडत होते. त्यामुळे संशय बळावला आणि काही वाहनचालकांनी इंधन टाकी उघडून पाहिल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले, इंधन टाकीत पेट्रोलऐवजी मोठ्या प्रमाणात पाणी मिसळलेले होते.

भेसळ की दुर्लक्ष? चौकशी सुरू (Water In Petrol)

या प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा आणि इंधनाच्या गुणवत्तेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मायपुणेप्लसडॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, या पंपावर विकले गेलेल्या इंधनाच्या प्राथमिक चाचणीत ८०% पाणी आणि केवळ २०% पेट्रोल असल्याचे स्पष्ट झाले.

---Advertisement---

हा प्रकार जाणूनबुजून करण्यात आला की व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे घडला, याचा तपास सुरू आहे. खराब देखभाल आणि पंपाच्या स्टोरेज टाक्यांमध्ये पाणी शिरल्यामुळेही ही भेसळ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाची तत्काळ कारवाईची मागणी

नाराज वाहनचालकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून, संबंधित पंपावरील इंधन नमुने त्वरित तपासण्यात यावेत, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; काँग्रेसकडून तीव्र विरोध

तुमचं UPI व्यवहार अयशस्वी झाल्यास आता त्वरित रिफंड मिळणार

आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर, 22 मार्चपासून रंगणार खेळ

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, पंतप्रधान मोदींनी केले आवाहन

ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांसाठी भरती, वाचा संपुर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles