मुंबई : भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने ग्राहकांसाठी नवीन “स्मार्ट पेन्शन योजना” सुरू केली आहे. ही सिंगल प्रीमियम त्वरित वार्षिकी (Immediate Annuity) योजना असून, ग्राहकांना निश्चित आणि स्थिर उत्पन्नाचा लाभ देणारी आहे. (LIC Policy)
ही योजना निवृत्ती पश्चात आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना एकदाच प्रीमियम भरल्यानंतर तत्काळ पेन्शन सुरू करण्याची सुविधा मिळते. तसेच, वैयक्तिक तसेच संयुक्त जीवन वार्षिकीचे पर्यायही उपलब्ध आहेत.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये (LIC Policy) :
- तत्काळ पेन्शन – एकदाच प्रीमियम भरून त्वरित पेन्शन सुरू करण्याचा पर्याय.
- विविध वार्षिकी योजना – ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध.
- वयोमर्यादा – किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय १०० वर्षे (वार्षिकी प्रकारावर अवलंबून).
- व्यक्तिगत आणि संयुक्त पर्याय – सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ वार्षिकी योजना.
- LIC ग्राहकांसाठी विशेष लाभ – विद्यमान पॉलिसीधारक आणि त्यांच्या नॉमिनींसाठी अतिरिक्त वार्षिकी दराचा फायदा.
- तरलता सुविधा – आंशिक किंवा संपूर्ण रक्कम काढण्याचा पर्याय.
- पेन्शन पर्याय – मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात पेन्शन घेता येते.
- डिजिटल खरेदी सुविधा – ग्राहकांना ही योजना LIC च्या अधिकृत वेबसाइट www.licindia.in वरून ऑनलाइन खरेदी करता येते.
ही योजना निवृत्त व्यक्तींसाठी तसेच स्थिर उत्पन्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श पर्याय ठरू शकते.
अधिक माहितीसाठी LICच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या LIC शाखेशी संपर्क साधा!

हे ही वाचा :
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!
‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?
महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार